दूध संकलन
दूध निर्यात
धान्य बँक
१९७५ सालानंतर गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम गावामध्ये सुरू झाले. सुरूवातीस प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पुरेसे धान्यांचे उत्पादन होत नव्हते. त्यामुळे गावातील काही शेतकऱ्यांना धान्यांची उपलब्धता होत नव्हती. अशा वेळी ज्या शेतकऱ्यांना जास्तीचे धान्य उत्पादन होत होते असे शेतकरी धान्य बँकेमध्ये धान्य जमा करत होते. आणि ज्या परिवारांमध्ये धान्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना ते धान्य दिले जायचे. त्या शेतकऱ्याकडे ज्यावेळेस धान्य उत्पादन होईल त्यावेळस त्याने ते धान्य त्या बँकेत जमा केले जायचे.